२ तलवारी, ट्रकसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Foto

छत्रपती संभाजीनगर,  (सांजवार्ता ब्युरो) : निलजगाव फाटा परिसरात सार्वजनिक ठिकाणी तलवारी बाळगून दहशत निर्माण करणार्‍या तीन जणांना बिडकीन पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३०) रात्री अटक केली. त्यांच्याकडून दोन तलवारी, एक ट्रक, दुचाकी आणि मोबाइल असा एकूण १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
या प्रकरणी हवालदार हनुमान धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री ११.१५ च्या सुमारास पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कृष्णा नामदेव दिंडे (२६, रा. परदरी), संतोष रमेश जगदाळे (३१, रा. बिडकीन) आणि सुनील अशोक चांदणे (२५, रा. मारगव्हाण, जि. जालना) यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या झडतीत ८४ सेंमी लांबीच्या दोन लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या. गुन्ह्यात वापरलेला १० लाख रुपये किमतीचा १८ टायर ट्रक (एमएच २० जीसी ९८०९), एक मोटारसायकल (एमएच २० एपी ६७२८) आणि तीन मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपींविरुद्ध शस्त्रा अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिसा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बिडकीन पोलिस करत आहेत.